शहिदांच्या नावे मते मागितली; मोदींविरुद्धच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

Foto

नवी दिल्‍ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणारे वीर जवान यांच्या नावाने मतदान करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार. काँग्रेस आणि माकपने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून मोदींच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप व अहवाल मागवला आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा येथे काल मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने भाजपला मत द्या, असे भावनिक आवाहन नवमतदारांना केले. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे व उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप-सेना महायुतीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.